Reconnect and Reminisce. Join us on 21st December 2024 for the Alumni Meet. Click here to Register!

Awareness program on contemporary crimes held at MGM University


07 February 2024


In this area of internet, many never types of crimes are happening in society. But it is possible to defeat the criminals. Students should remain cautious while using social media and immediately inform the police, if they notice any untoward incident," said Asst. Police Inspector, Ms. Premlata Jagtap.
Ms. Jagtap was speaking in an awareness program organized by MGM University's School of Basic & Applied Sciences and Railway Police, Chhatrapati Sambhajinagar in the Aryabhata Hall of the University.
-------------

समाजमाध्यमे वापरत असताना काळजी घेणे आवश्यक... : सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप

एमजीएममध्ये ‘सायबर गुन्हेगारी’ आणि ‘दहशतवाद विरोधी’ जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न



समकालीन काळामध्ये विविध प्रकारच्या गुन्हेगारीला आपण सामोरे जात असून या सर्वांवर मात करणे शक्य आहे. विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमे वापरत असताना काळजी घेत काही चुकीचे होत असल्यास तत्काळ पोलिसांची संपर्क साधने आव
श्यक असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान विद्याशाखा (एसबास) आणि लोहमार्ग पोलीस, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात ‘सायबर गुन्हेगारी’ आणि ‘दहशतवाद विरोधी’ जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस अंमलदार किरण आघाव, विभागप्रमुख प्रा.डॉ.के. एम.जाधव, डॉ.क्रांती झाकडे, प्रा.डॉ.प्रफुल्ल शिंदे, डॉ. विद्या देशमुख, डॉ.आशा डागर, डॉ.मोईन सिद्धिकी, पोलीस शिपाई वैभव पाटील, विशाल जाधव, विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप पुढे बोलताना म्हणाल्या, समाजमाध्यमे वापरत असताना आपण आपल्या खात्याला खाजगी ठेवणे गरजेचे आहे. कोणाचीही मैत्रीची विनंती स्वीकारत असताना संबंधित व्यक्ति आपल्या परिचयाची आहे किंवा कसे याची शहनिशा करीत त्याबद्दल निर्णय घ्यावा. तंत्रज्ञानाच्या या काळामध्ये कोणतेही ऍप आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करीत असताना त्याची परिपूर्ण माहिती घेऊनच त्याचा वापर करा. आपला मोबाईल हरवल्यास https://www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करीत तुम्ही आपल्या मोबाईलचा होणार गैरवापर थांबू शकता.

पोलीस अंमलदार किरण आघाव यांनी सध्याच्या काळामध्ये दहशतवादाच्या समस्येला विद्यार्थी म्हणून आपण कशा पद्धतीने मार्ग काढू शकतो याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अंमलदार किरण आघाव म्हणाले, युवा पिढी ही देशाचा कणा असून तरुणाईने स्वत: सुरक्षित राहत राष्ट्राला सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे. आपण कोणत्याही व्हॉट्स अप, टेलिग्राम, फेसबुक आणि इतर समुहामध्ये सहभागी होत असताना पूर्णपणे सत्यता पडताळून पाहिली पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के. एम जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निकेश इंगळे यांनी केले तर आभार डॉ.मानसी महाडीक यांनी मानले.

Gallery Images