Reconnect and Reminisce. Join us on 21st December 2024 for the Alumni Meet. Click here to Register!

Indian education system moving in the right direction - Prof. Fabio Biscarini

International Conference Inaugurated at MGM University.

Materials Science and Nanotechnology for Sustainable Applications will be discussed in the two-day conference


23 March 2023


India is a country of youth and its education system is moving in the right direction. Prof. Fabio Biscarini shared this opinion in a keynote address on the topic of 'Organic transistors for bio- and neuroelectronics: from nanoscale effects to in vivo recordings' at MGM University.

Prof. Biscarini was speaking at the inauguration ceremony of a two-day conference on 'Materials Science and Nano Technology for Sustainable Applications - 2023' at Rukmini Auditorium, MGM University, Chhatrapati Sambhajinagar.

In the inaugural session of the conference, senior scientist of Bhabha Atomic Research Center, Prof. J. V. Yakhmi, Dr. R. R. Shinde interacted with the participants whereas, in the second session, Prof. S. H. Pawar, Dr. R. Rukmani, Prof. Jogad had discussions with the attendees. A booklet of the research papers was also published during the event at the hands of the dignitaries. The Chancellor of MGM University, Shri Ankushrao Kadam, Vice-Chancellor Dr. Vilas Sapkal, Registrar Dr. Ashish Gadekar, Dr. K. M. Jadhav, Dr. K. R. Jhakde, Principal, Professors, Researchers, Students and other eminent personalities from society were also present on the occasion.

The Vice-chancellor Dr. Sapkal welcomed all participants and congratulated them for taking up such an important topic for discussion. Many other dignitaries also sent their wishes for the success of the conference.

A wide range of topics like Bio Materials and Tissue Engineering, Energy Storage and Conversion Devices, Nuclear Materials, Food Nanotechnology, Green Synthesis, Catalysis and Catalytic Materials, Nanomedicine and Nanodiagnostics, Environmental Health and Toxicology, Biomedical Applications etc. will be discussed during the conference.
-------------

भारतीय शिक्षणव्यवस्था चांगल्याप्रकारे कार्यरत...
-: प्रा. फॅबिओ बिसकारनी

एमजीएम’मध्ये आंतररराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न
मटेरियल्स सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल अप्लिकेशन्स’ विषयावर होणार दोन दिवस चर्चा

भारत हा तरूण देश असून येथील शिक्षणव्यवस्था चांगल्याप्रकारे कार्यरत आहे, असे प्रतिपादन इटलीचे प्रा. फॅबिओ बिसकारनी यांनी ‘ऑरगॅनिक ट्रान्सिस्टर्स फॉर बायो - अँड न्यूरोइलेक्ट्रॉनिक्स : फ्रॉम नॅनोस्केल इफेक्ट्स टू इन विवो रेकॉर्डिंग्स' या विषयावरील बीजभाषणामध्ये केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विज्ञान विभागाकडून 'मटेरियल्स सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल अप्लिकेशन्स - २०२३' या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

आज झालेल्या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रामध्ये भाभा अणु संशोधन केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जे. व्ही. याखमी, डॉ. आर. आर. शिंदे तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. एस. एच. पवार, डॉ.आर. रुकमणी, प्रा. जोगड यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी शोधनिबंधांच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उद्घाटनपर कार्यक्रमास कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, डॉ. के. एम. जाधव, डॉ. के. आर. झाकडे, आधिष्ठाता, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित उपस्थित होते.

श्री. सपकाळ म्हणाले, या दोन दिवसीय परिषदेत मी सर्व सहभागी झालेल्या संशोधकांचे एमजीएममध्ये सहर्ष स्वागत करतो. या दोन दिवसांमध्ये विविध विषयांवर चर्चा संपन्न होणार आहे. अनेक मान्यवरांनी या परिषदेसाठी आपल्या शुभेच्छा पाठविल्या आहेत. संशोधन क्षेत्रातील सर्वांना या परिषदेचा फायदा होणार आहे.

बायो मटेरिअल्स अँड टिशू इंजिनियरिंग, एनर्जी स्टोरेज अँड कन्व्हर्शन डिव्हाईसेस, न्यूक्लियर मटेरियल्स, फूड नॅनोटेक्नॉलॉजी, ग्रीन सिन्थेसिस, कॅटॅलिसिस अँड कॅटॅलिटिक मटेरियल्स, नॅनोमेडिसिन अँड नॅनोडायग्नॉस्टिक्स, इन्व्हायरन्मेंटल हेल्थ अँड टॉक्सिकोलॉजी, बायोमेडिकल अप्लिकेशन्स इ. विषयांवर मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

Gallery Images