Reconnect and Reminisce. Join us on 21st December 2024 for the Alumni Meet. Click here to Register!

International conference on advanced science & Technology concludes at MGM University

Researchers from around the world share their thoughts

24 March 2023


The two-day conference on 'Materials Science and Nano Technology for Sustainable Applications - 2023' concluded successfully at Rukmini Auditorium of MGM University in the presence of dignitaries from around the world.

Over 275 researchers including many senior scientists such as Bhabha Atomic Research Centre’s Prof. J. V. Yakhmi, Prof. Fabio Biscarni, Dr. R. R. Shinde, Prof. S. H. Pawar, Dr. R. Rukmani, Prof. Jogad and Prof. N. R. Singh participated and interacted with the audience in the conference. 220 research papers were presented in the conference. The papers were also compiled in a book which was published at the hands of the dignitaries during the event.

The detailed discussions over a variety of topics like Bio Materials and Tissue Engineering, Energy Storage and Conversion Devices, Nuclear Materials, Food Nanotechnology, Green Synthesis, Catalysis and Catalytic Materials, Nanomedicine and Nanodiagnostics, Environmental Health and Toxicology and Biomedical Applications helped researchers and students to understand them better.

The Chancellor of MGM University, Shri Ankushrao Kadam, Registrar Dr. Ashish Gadekar, Dr. Prati Deshmukh, Dr. K. M. Jadhav, Dr. K. R. Zakde, Dr. S. B. Sapkal, Dr. Ashish Itolikar, Dr. Gajanan Lomte, Dr. P.D. Shinde, Vidya Deshmukh, Deans, Professors, Researchers and Students attended the conference.
------------------

एमजीएम’मध्ये आंतररराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न
जगभरातील संशोधकांनी मांडले विचार...


महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विज्ञान विभागाकडून 'मटेरियल्स सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल अप्लिकेशन्स - २०२३' या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाभा अणु संशोधन केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जे. व्ही. याखमी, प्रा. फॅबिओ बिसकारनी, डॉ. आर. आर. शिंदे, प्रा. एस. एच. पवार, डॉ.आर. रुकमणी, प्रा. जोगड, प्रा. एन. आर. सिंग आदि मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. या आंतरराष्ट्रीय परिषदेत २७५ संशोधक सहभागी झाले होते. तसेच परिषदेत २२० शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले. शोधनिबंधांच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रकाशन करण्यात आले.

समारोप कार्यक्रमास कुलपती अंकुशराव कदम, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ. के. एम. जाधव, डॉ. के. आर. झाकडे, डॉ. एस. बी. सपकाळ, डॉ. आशिष इटोलीकर, डॉ.गजानन लोमटे, डॉ. पी.डी. शिंदे, विद्या देशमुख, आधिष्ठाता, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित उपस्थित होते.

या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत बायो मटेरिअल्स अँड टिशू इंजिनियरिंग, एनर्जी स्टोरेज अँड कन्व्हर्शन डिव्हाईसेस, न्यूक्लियर मटेरियल्स, फूड नॅनोटेक्नॉलॉजी, ग्रीन सिन्थेसिस, कॅटॅलिसिस अँड कॅटॅलिटिक मटेरियल्स, नॅनोमेडिसिन अँड नॅनोडायग्नॉस्टिक्स, इन्व्हायरन्मेंटल हेल्थ अँड टॉक्सिकोलॉजी, बायोमेडिकल अप्लिकेशन्स इ. विषयांवर मान्यवर वक्त्यांनी आपले विचार मांडले.

Gallery Images