Reconnect and Reminisce. Join us on 21st December 2024 for the Alumni Meet. Click here to Register!

Lecture on 'New Theory of Atomic Model' organized at MGM University


12 February 2024


'New Theory of Atomic Model', a special lecture of Dr. Ghanshyam Jadhav, Principal, Shivaji College, Umarga was organized by the Physics Department, Schools of Basic and Applied Sciences, MGM University. In this lecture, Dr. Jadhav shed light on the latest research and findings in the field of atomic studies. He also illustrated the historical development of the field and how scientist community is yet to solve many unsolved puzzles about the structure and function of an atom. Professors, researchers and students enjoyed insightful talk, which explained the complex topic in a simplified manner.
----------------------------------

एमजीएममध्ये ‘अटॉमिक मॉडेलचा नवा सिद्धांत’ विषयावर डॉ.घनश्याम जाधव यांचे व्याख्यान संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान विद्याशाखा (एसबास) भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने उमरगा येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव यांचे ‘अटॉमिक मॉडेलचा नवा सिद्धांत’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.जाधव यांनी विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांच्यासमवेत संवाद साधला.

डॉ.जाधव यावेळी बोलताना म्हणाले, आजपर्यंत विज्ञानातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अणु असून याची संकल्पना विविध शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडली. यामध्ये अगदी सुरुवातीला भारतीय प्राचीन ऋषि कनाद यांनी अणुची संकल्पना मांडली. कोणत्याही पदार्थाच्या लहानात - लहान कणाला ऋषि कनाद यांनी अणु असे संबोधिले. त्यानंतर रुदरफोर्ड, डालटन, बोहर, इत्यादि शास्त्रज्ञांनी अणूची संकल्पना दिली. तर अणूच्या आधुनिक संकल्पनेनुसार ते प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यापासून बनलेले असतात तर इलेक्ट्रॉन ही अनुकेंद्राभोवती विविध कक्षेत स्थिर कक्षेत फिरत असतात.

अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स हे कसे स्थिर होतात; हे आजही स्पष्ट नाही. विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की, अणूमध्ये सर्व इलेक्ट्रॉन्स फिरत असतील तर त्यापासून घट्ट पदार्थ कसे तयार होऊ शकतो? यावरती कोणालाही समर्पक स्पष्टीकरण देता येत नाही. अणुपासून प्रकाशाची निर्मिती होते व त्या प्रकाशाला फ्रिक्वेन्सी असते. तो प्रकाश निर्माण होण्यासाठी संबंधित इलेक्ट्रॉन त्या फ्रिक्वेन्सीने कंप पावला पाहिजे हेदेखील स्पष्ट आहे, पण याबाबत कुणालाही स्पष्टीकरण देता येत नाही. ह्या सर्व गोष्टी असे संकेत देतात की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स हे कक्षेमध्ये फिरत नाहीत तर ते स्पीन मोशनमुळे केंद्रकापासून ठराविक अंतरावर स्थिर राहू शकतात. जे सध्या विज्ञान जगतात चर्चेला येत असल्याचे डॉ. घनश्याम जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी डॉ.घनश्याम जाधव यांनी लिहिलेल्या 'लाईट क्वांटा : आईन्स्टाईन्स बिग मिस्टेक' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.के.एम.जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकेश इंगळे यांनी केले तर आभार प्रा. सूर्यकांत सपकाळ मानले.

Gallery Images