3 Days Workshop conducted on Functional materials: Synthesis, properties and Applications


19 october 2024


On behalf of the Department of Physics, Mahatma Gandhi Mission University, a three-day workshop on the topic Functional Materials: Synthesis, Properties and Applications' was successfully concluded in Einstein Auditorium of the university in the presence of dignitaries.
In this workshop Dr. Sanjay Dhoble, Professor of Physics Department of Nagpur University, International Researcher Prof. Dr. Gajanan Bodkhe and on behalf of the University Vice Chancellor Dr. Vilas Sapkal, Registrar Dr. Ashish Gadekar, Principal Dr. Prati Deshmukh, Director Dr. Annasaheb Khemner, Director Dr. Parminder Kaur Dhingra, Prof. Dr. K. М. Jadhav, Head of Department of Physics Dr. K. R. Zakde, professors, students and all concerned were present.
In the first day's session, Prof. Dr. K. M. Jadhav interacted with the students on the topic of 'Nano Technology and Nano Material Synthesis'. What is nanotechnology? Nano Material Synthesis Techniques and its Applications and also demonstrated the Solgel Method. Speaking on the subject of 'Sensor in Everybody's Life and Detection of Environmental Pollutants' through binoculars, international researcher Prof. Dr. Gajanan Bodkhe explained in detail about sensors, transducers and actuators.
On the second day, the lecture of Dr. Sanjay Dhoble, Professor, Department of Physics, Nagpur University, on the subject of 'Research Paper and Revive Paper was concluded in association with Internal Quality Assurance Cell (IQAC) and Department of Physics. In this, he gave detailed guidance on how to write a research project and how to present it.
On the third day, an exhibition of the projects prepared by the students was held. In this, the students gave information about their various innovative projects. This exhibition was inaugurated by Dr. Sanjay Dhobale and Vice Principal of Jawaharlal Nehru College of Engineering Prof. Dr. Vijaya Musande. Among the projects submitted by the students, 3 best projects were selected. The students who presented this project were honored by dignitaries. Water Irrigation System, Smart Vehicle Parking System, Solar Based Pumping System, 3 projects bagged the first, second and third positions respectively.
For the success of this three day workshop Dr. K. R. Zakde, Head of Physics Department, Dr. Nikeshkumar Ingle, Dr. Manasi Mahadik, Prof. Sakshi Devdhe, Dr. Harshada Patil, Dr. Lokendra Pratap Singh, Prof. Saurabh Surse and all concerned tried.
----------------------------------------------------------

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने 'फंक्शनल मटेरियल्स : सिंथेसिस, प्रॉपर्टीज अँड अप्लिकेशन्स' या विषयावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळा विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाली.



या कार्यशाळेस नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे, आंतरराष्ट्रीय संशोधक प्रा. डॉ. गजानन बोडखे तर विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, संचालक डॉ. अण्णासाहेब खेमनर, संचालक डॉ. परमिंदर कौर धिंग्रा, प्रा.डॉ. के.एम. जाधव, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. आर. झाकडे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये प्रा. डॉ. के. एम. जाधव यांनी 'नॅनो टेक्नॉलॉजी अँड नॅनो मटेरियल सिंथेसिस' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय? नॅनो मटेरियल सिंथेसिस टेक्निक्स अँड इट्स अप्लिकेशन्स तसेच सॉलजेल मेथड यावर माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. 'सेंसर इन एव्हरीबडी लाईफ अँड डिटेक्शन ऑफ इन्व्हायरन्मेंटल पोलुटेंट्स' या विषयावर दुरदृश्यप्रणालीद्वारे बोलताना आंतरराष्ट्रीय संशोधक प्रा. डॉ. गजानन बोडखे यांनी सेन्सर, ट्रान्सड्युसर आणि अक्युएटर याबाबत सविस्तरपणे माहिती सांगितली. त्याचप्रमाणे गॅस सेन्सर, हेव्ही मेटल, आयऑन सेन्सर्स आणि बायो सेन्सर यावरील संशोधनावर माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष (आयक्युएसी) आणि भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'रिसर्च पेपर अँड रिविव्ह पेपर' या विषयावर नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यामध्ये त्यांनी संशोधन प्रकल्प कसे लिहायचे आणि त्याचे सादरीकरण कशा पद्धतीने करायचे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती उपस्थितांनी दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. संजय ढोबळे व जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. विजया मुसांडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांपैकी ३ उत्कृष्ट प्रकल्प निवडण्यात आले. ही प्रकल्प सादर करण्याऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वॉटर इरिगेशन सिस्टीम, स्मार्ट व्हेईकल पार्किंग सिस्टीम, सोलर बेस्ड पंपिंग सिस्टीम या ३ प्रकल्पांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. या तीन दिवसांच्या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी भौतिकशास्त्न विभागप्रमुख डॉ. के. आर. झाकडे, डॉ. निकेश इंगळे, डॉ. मानसी महाडीक, प्रा. साक्षी देवधे, डॉ. हर्षदा पाटील, डॉ. लोकेन्द्र प्रतापसिंग, प्रा. सौरभ सुरसे व सर्व संबंधितांनी प्रयत्न केले.

Gallery Images