MGM University Inaugurates International Conference ICNBICT-2025


24 March 2025


The two-day international conference on "Nano-Bio-Info and Cogno-Technology for Societal Benefit" (ICNBICT-2025), organized by the Department of Physics at the School of Basic and Applied Sciences, MGM University, was inaugurated today at Rukmini Auditorium in the esteemed presence of dignitaries.
The inauguration ceremony was graced by Prof. U. Kamachi Mudali, Vice-Chancellor of Homi Bhabha National Institute, Mumbai; Prof. Dr. Atul Vaidya, Vice-Chancellor of Lakshminarayan Innovation Technological University; internationally renowned scientist Prof. J. V. Yakhmi from Bhabha Atomic Research Centre; and Dr. R. S. Shinde, scientist.
Also present on this occasion were Shri Ankushrao Kadam, Chancellor of MGM University; Prof. Dr. Vilas Sapkal, Vice-Chancellor; Dr. Ashish Gadekar, Registrar; Dr. Prapti Deshmukh, Dean; Dr. A. S. Khemnar, Director; Dr. K. M. Jadhav, Emeritus Professor; Dr. Kranti Zakade, along with other distinguished dignitaries.

-----------------------------------

एमजीएममध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न

प्रश्नमंजुषा, प्रकल्प आणि पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


छत्रपती संभाजीनगर, दि.२४ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने ‘नॅनो - बायो-इन्फो अँड कॉग्नो - टेक्नॉलॉजी फॉर सोसायटल बेनिफिट’ (ICNBICT-2025) या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज रुक्मिणी सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबईचे कुलगुरू प्रा.यू.कामाची मुदली, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ.अतुल वैद्य, भाभा अणु संशोधन केंद्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. जे.व्ही.याखमी, शास्त्रज्ञ डॉ.आर.एस.शिंदे तसेच यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, संचालक डॉ.ए.एस.खेमनार, इमेरीटस प्रोफेसर डॉ.के.एम.जाधव, डॉ.क्रांती झाकडे व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी डिजिटल द्वीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमेरीटस प्रोफेसर डॉ.के.एम.जाधव यांनी केले तर आभार डॉ.क्रांती झाकडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यात बोलताना मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार खालीलप्रमाणे आहेत : या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सुरुवातीला मी आपल्या सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो जो सर्वांना विशेषत: विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने आपला विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यांस ‘अजेंडा २०३०’ असे म्हणतात. यामध्ये १७ उद्दिष्टे आणि १६९ लक्ष्य ठेवण्यात आली होती. हे जग शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे जाहीर केली आहेत यामध्ये एक ‘पाणी’ हे एक उद्दिष्ट आहे. आपण आज भारताचा विचार करत असताना जगाच्या १८% लोकसंख्या आपल्याकडे आहे. मात्र, केवळ ४% पाणी उपलब्ध आहे. यापैकी २.५% पाणी पृष्ठभागावर उपलब्ध आहे. या स्थितीला गांभीर्याने घेणे आवश्यक असून उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांची जपवणूक करणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे या परिषदेच्या अनुषंगाने विचार करत असताना आपण समाजाच्या भल्यासाठी आंतरविद्या आणि बहूविद्याशाखीय संशोधन करणे गरजेचे आहे.

Gallery Images