----------------------------------
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान विद्याशाखा (एसबास) भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने उमरगा येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव यांचे ‘अटॉमिक मॉडेलचा नवा सिद्धांत’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.जाधव यांनी विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांच्यासमवेत संवाद साधला.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे डॉ.सूर्यकांत सपकाळ व डॉ.सुचिता गादेकर यांना ‘इनोव्हेटिव्ह कॅटलिस्ट प्रोसेस फॉर असेमेट्रिक सिंथेसिस ऑफ कैरल कंपाऊंड’ या विषयावरील संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.
डॉ.सूर्यकांत सपकाळ हे एमजीएम विद्यापीठामध्ये विभागप्रमुख व संशोधन मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे एडिटरियल बोर्ड मेंबर तसेच मेंबर ऑफ रिव्ह्यूवर् म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अठ्ठेचाळीस शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत.
या यशाबद्दल डॉ.सूर्यकांत सपकाळ आणि डॉ.सुचिता गादेकर यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, संचालक डॉ.अण्णासाहेब खेमनर व सर्व संबंधितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.