17th International Multidisciplinary Conference Education: June 12-13, 2026; MGMU

एमजीएम विद्यापीठातील समुदाय विज्ञान विभाग : शिक्षणातून समाजपरिवर्तनाकडे वाटचाल


Feb 23, 2026


blog image
 

आजच्या वेगाने बदलणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीत केवळ शैक्षणिक पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर समाजाच्या गरजा समजून घेऊन त्यासाठी उपयुक्त ठरणारे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या दृष्टीने एमजीएम विद्यापीठातील समुदाय विज्ञान विभाग हा शिक्षण आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवून आणणारा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. हा विभाग व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे सक्षम आणि जबाबदार मनुष्यबळ घडविण्याचे कार्य करतो.

समुदाय विज्ञान : जीवनाशी निगडित शास्त्र

समुदाय विज्ञान हे मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्याशी जोडलेले शास्त्र आहे. आहार व पोषण, आरोग्य संवर्धन, बालविकास, कौटुंबिक जीवन, गृहव्यवस्थापन, वस्त्र व परिधान, पर्यावरण जतन, ग्रामीण व नागरी समुदाय विकास अशा विविध क्षेत्रांचा समावेश समुदाय विज्ञानामध्ये केला जातो. या विषयाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजातील समस्या ओळखण्याची क्षमता निर्माण होते आणि त्या समस्यांवर शास्त्रीय व व्यावहारिक उपाय शोधण्याचे कौशल्य विकसित होते.

समाजातील कुपोषण, आजारपण, अस्वच्छता, बेरोजगारी, महिलांचे सक्षमीकरण, बालसंरक्षण, कौटुंबिक ताणतणाव यांसारख्या अनेक समस्यांवर काम करण्यासाठी समुदाय विज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे हे शास्त्र केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता समाजासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

समुदाय विज्ञान म्हणजे काय?

समुदाय विज्ञान हा विस्तारित व आधुनिक स्वरूपाचा विषय आहे. हा विषय घर, कुटुंब, समाज आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करतो.

समुदाय विज्ञान मध्ये समाविष्ट प्रमुख क्षेत्रे:

  • पोषण व आहारशास्त्र
  • बालविकास व मानवी विकास
  • वस्त्रशास्त्र, फॅशन आणि टेक्सटाईल
  • संसाधन व कुटुंब व्यवस्थापन
  • समुदाय आरोग्य व जनजागृती
  • उपभोक्ता शिक्षण हा विषय सैद्धांतिक ज्ञान, प्रत्यक्ष प्रयोग, फील्डवर्क आणि समाजाशी थेट संपर्क यावर आधारित आहे.

समाजविकासात समुदाय विज्ञानाची भूमिका

समुदाय विज्ञान विभागातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी समाजातील सकारात्मक बदलाचे वाहक ठरतात. कुपोषण निर्मूलन, आरोग्यविषयक जागरूकता, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन, महिलांचे सक्षमीकरण, बालसंरक्षण आणि कौटुंबिक जीवनमान उंचावणे यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते.

समाजाच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार कार्य करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ घडविण्याचे कार्य हा विभाग करतो, जे समाजाच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक आहे.

एमजीएम विद्यापीठातील मधील समुदाय विज्ञान अभ्यासक्रम

समुदाय विज्ञान पदवी (सन्मान) अभ्यासक्रम

कालावधी : चार वर्षे
(नवीन शैक्षणिक धोरणानुसार बहुप्रवेश व बहिर्गमन सुविधा उपलब्ध)

अभ्यासक्रमातील प्रमुख विषय :

  • मानवी पोषण व अन्नविज्ञान
  • बालविकास व कौटुंबिक संबंध
  • वस्त्ररचना, वस्त्रविज्ञान व फॅशन अभ्यास
  • संसाधन व्यवस्थापन व अंतर्गत रचना
  • सामुदायिक आरोग्य, स्वच्छता व विस्तार शिक्षण

  • आहार नियोजन व पोषण मूल्यांकन
  • सामुदायिक सर्वेक्षण व क्षेत्रकार्य
  • वस्त्रनिर्मिती व वस्त्ररचना
  • प्रशिक्षण कालावधी व कौशल्याधारित प्रशिक्षण

उद्दिष्ट :

विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, स्वावलंबी व सामाजिकदृष्ट्या जागरूक नागरिक बनवणे.

समुदाय विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रम

कालावधी : दोन वर्षे

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :

  • अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :
  • चिकित्सीय व उपचारात्मक पोषण
  • सार्वजनिक आरोग्य व जीवनशैली व्यवस्थापन
  • प्रगत बालविकास
  • वस्त्र व वस्त्रतंत्रज्ञान
  • संशोधन पद्धती व सांख्यिकी

संशोधन व प्रकल्प कार्य :

  • प्रबंध अथवा संशोधन प्रकल्प
  • समुदायाधारित प्रकरण अभ्यास
  • पोषण व आरोग्यविषयक संशोधन

उद्दिष्ट :

विद्यार्थ्यांना तज्ज्ञ पोषणतज्ज्ञ, संशोधक, शिक्षक व सल्लागार म्हणून सक्षमपणे घडवणे.

समुदाय विज्ञान विषयातील संशोधन पदवी

कालावधी : किमान तीन ते सहा वर्षे

पात्रता : समुदाय विज्ञान किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी

संशोधनाची प्रमुख क्षेत्रे :

  • सामुदायिक पोषण व सार्वजनिक आरोग्य
  • माता व बाल आरोग्य
  • जीवनशैलीजन्य आजार व आहार उपचार
  • वस्त्र व परिधान क्षेत्रातील नवोपक्रम
  • महिलांचे सक्षमीकरण व कौटुंबिक अध्ययन
  • ग्रामीण व नागरी समुदाय विकास

संशोधन पदवीची वैशिष्ट्ये :

  • अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक
  • आधुनिक संशोधन पद्धतींचा वापर
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन लेखन व प्रकाशन
  • चर्चासत्रे, कार्यशाळा व परिषदांमध्ये सहभाग

करिअरच्या संधी

समुदाय विज्ञान विषयातून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांमध्ये अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात. पोषणतज्ज्ञ, आरोग्य सल्लागार, बालविकास अधिकारी, महिला व बालकल्याण विभागातील कर्मचारी, समाजविकास अधिकारी, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्ता, अन्न प्रक्रिया उद्योगातील तज्ञ, शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांमधील प्राध्यापक अशा विविध भूमिका विद्यार्थ्यांना निभावता येतात.

याशिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र चालवणे, सल्लागार सेवा देणे यांसारख्या स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध आहेत. समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समुदाय विज्ञान हे एक सशक्त माध्यम आहे.

  • पोषण व आरोग्य क्षेत्रातील तज्ञ म्हणून कार्य
  • महिला व बालकल्याण विभागामध्ये सेवा
  • समाजविकास अधिकारी म्हणून संधी
  • स्वयंसेवी संस्थांमध्ये सामाजिक कार्य
  • अन्न प्रक्रिया व संबंधित उद्योगांमध्ये रोजगार
  • शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांमध्ये अध्यापन
  • संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात करिअर
  • स्वयंरोजगार व सल्लागार सेवा सुरू करण्याची संधी

एमजीएम विद्यापीठ– समुदाय विज्ञान विभाग का निवडावे?

  • NEP 2020 आधारित अभ्यासक्रम
  • संशोधन व कौशल्य विकासावर विशेष भर
  • अनुभवी प्राध्यापक व आधुनिक सुविधा
  • समाजाशी थेट संपर्क व फील्डवर्क
  • करिअर, संशोधन आणि समाजसेवेचा समन्वय

निष्कर्ष

एमजीएम विद्यापीठ चा समुदाय विज्ञान विभाग हा केवळ शिक्षण देणारा विभाग नसून समाज परिवर्तनाची दिशा आहे. येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आरोग्यदायी समाज, सक्षम कुटुंब आणि उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करतात.

- Author: Ms. Antara Kulkarni
Assistant Professor
Department of Community Science,
School of Basic & Applied Sciences,
MGM University,
Chhatrapati Sambhajinagar,
Maharashtra, India.

Gallery Images