MGM University Celebrates National Science Day with ‘Quizardry 2.0’


04 March 2025


MGM University’s Department of Basic and Applied Sciences celebrated National Science Day with great enthusiasm. On this occasion, a science and technology-based quiz competition, "Quizardry 2.0", along with project presentations and a poster exhibition competition, was organized. All the winning students of these competitions were felicitated with awards by esteemed dignitaries.
On this occasion, Prof. Dr. S. T. Mhaske, Director of the Institute of Chemical Technology, Jalna, Prof. Dr. Vilas Sapkal, Vice-Chancellor of MGM University, Dr. Annasaheb Khemnar, Director - Institute of BioScience & Technology, Dr. Kranti Zakde, along with all department heads, faculty members, students, and other dignitaries, were present.
In the "Quizardry 2.0" quiz competition, 30 teams from 7 departments of School of Basic and Applied Sciences, as well as SOET, JNEC, UDICT, GYP, IBT, and other university institutions, participated and performed exceptionally well. The project exhibition saw the participation of 250 students presenting 65 projects. Meanwhile, 78 posters were exhibited, with 114 students participating, showcasing their research and innovative ideas.

---------------------------------

एमजीएममध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

प्रश्नमंजुषा, प्रकल्प आणि पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयवार आधारित ‘क्विझार्ड्री २.०’ प्रश्नमंजुषा, प्रकल्प आणि पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी, रसायन तंत्रज्ञान संस्था जालनाचे संचालक प्रा.डॉ.एस.टी.म्हस्के,एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ,संचालक डॉ.अण्णासाहेब खेमनर, प्रा.डॉ.क्रांती झाकडे,सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक,विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

‘क्विझार्ड्री २.०’ प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये एसबासच्या ७ विभागासह विद्यापीठाच्या एसओईटी, जेएनईसी, यूडीआयसीटी, जीवायपी आणि आयबीटी आदि विभाग आणि संस्थांमधील ३० संघांनी आपला सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली. या सहभागी प्रत्येक संघात तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. अत्यंत उत्कंठापूर्ण स्पर्धेनंतर 'टीम एम्पायर' (रोहन सरकाटे, वंदन ठाकूर, कृष्णा खिलारे, भौतिकशास्त्र विभाग) विजयी ठरले. द्वितीय क्रमांक 'टीम मॅटरमाइंड्स' (इतीप्रथम प्रसन्ना, तन्वी अरोरा, पूजा चौधरी, न्यायवैद्यकशास्त्र विज्ञान विभाग) आणि तृतीय क्रमांक 'टीम स्वराज' (ज्ञानेश्वर काळे, शाश्वत मेडे, आदित्य देवरे, बी.टेक. आयटी, यूडीआयसीटी) यांनी पटकावला.

पोस्टर प्रदर्शनात ७८ पोस्टर्स सादर करण्यात आले, ज्यात ११४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला होता. या पोस्टर प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या संशोधनाची आणि नवकल्पनांची झलक पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये आयबीटी संस्थेच्या अविष्कार चोंधे आणि कीर्ती सापळे यांनी सदर केलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजियन्स पावर्ड रिमोट कंट्रोल सॉईल मायक्रो नुट्रीएंट डिटेक्शन सिस्टीम’ या पोस्टरला प्रथम, एसबास भौतिकशास्त्र विभागाच्या स्नेहल प्रधान आणि रुतुजा पेटकर यांच्या ‘पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट’ या पोस्टरला द्वितीय, जीवायपी महाविद्यालयाच्या प्रसाद लेम्बे, वरद चिलका, आकाश भुतेकर, अथर्व देशपांडे आणि गौरंग काठारे यांच्या फोकल लेन्थ (फिजिक्स ऑफ लेन्सेस) या पोस्टरला तृतीय तर जेएनईसी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी तरुण काळे, आदित्य घोडे, सर्वेश गोमटे यांच्या ‘इगन व्हेक्टर्स’ या पोस्टरला उत्कृष्ट पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रकल्प प्रदर्शनात २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले ६५ प्रकल्प सादर केले होते. ऍडवान्सड सोलर ट्रॅकिंग एनर्जी सिस्टीम, व्हेईकल सेफ्टी सेन्सर, वायरलेस डेटा ट्रान्स्फर थ्रू लाईट आणि वायरलेस सोलर पावर्ड एनर्जी सिस्टीम आदि प्रकल्पांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. श्रीनिवास औंधकर आणि डॉ.बारीक दिवटे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.रुत्विक शेडगे, डॉ.मानसी महाडिक, डॉ.विद्या देशमुख, डॉ.आशा डागर, डॉ.सुचिता गाडेकर, डॉ. शिल्पी देवांगन,प्रा.साक्षी देवधे, डॉ.एल.पी.सिंग, डॉ. प्रणय दिवटे,डॉ.एन.एन.इंगळे, डॉ.रुत्विक शेडगे, प्रा.संकेत जाधव, प्रा.प्रज्ञा सुळके, प्रा.पल्लवी मंडावकर, प्रा.हर्षदा मोरे,डॉ.जी.एस.पवार,डॉ.पी.डी.शिंदे,प्रा.हृतुजा कोंद्रे, प्रा.एस.ए.शिंदे, प्रा.एस.डी.भोसले, डॉ.एच.के.पाटील, डॉ.बालाजी मुळीक, डॉ.करुणा घोडके, प्रा.सौरभ सुरसे, प्रा.उत्तरा देशमुख आदींनी आपले योगदान दिले.

Gallery Images