11 August 2026
Chhatrapati Sambhajinagar, Aug. 11: The book ‘Mastering Forensic Science: 2500 MCQs for Competitive Exams’, authored by Prof. Gaurav Varade, Dr. Mohammad Khaja Moinuddin Siddiqui and Prof. Shruti Khairnar from the Department of Forensic Science, School of Basic and Applied Sciences, MGM University, was released by Vice-Chancellor Prof. Dr. Vilas Sapkal. Registrar Dr. Ashish Gadekar, Dean Dr. Prapti Deshmukh and other dignitaries were present on the occasion.
The book has been designed as a useful reference guide for students preparing for competitive examinations. Its 2,500 multiple-choice questions will help students prepare for examinations including UGC-NET, MH-SET, FACT, FACT Plus, CUET-PG, AIFSET and Assistant Professor recruitment examinations.
The publication is an important initiative by the department to promote academic excellence in forensic science education and strengthen preparation for competitive examinations.
MGM Chancellor Shri Ankushrao Kadam, Vice-Chancellor Prof. Dr. Vilas Sapkal, Registrar Dr. Ashish Gadekar and Dean Dr. Prapti Deshmukh congratulated the authors for their efforts. The authors expressed confidence that the book would be useful not only to forensic science students across the country but also to students and professionals preparing for various competitive examinations. The book is also available on online platforms.
----------------------------------
एमजीएममध्ये फॉरेन्सिक सायन्स विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि.११ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या फॉरेन्सिक सायन्स विभागातील प्रा.गौरव वराडे, डॉ.मोहम्मद खाजा मोईनुद्दीन सिद्दीकी आणि प्रा.श्रुती खैरनार या प्राध्यापकांनी लिहिलेल्या ‘मास्टरींग फॉरेन्सिक सायन्स : २५०० एमसीक्यूज फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
हे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ म्हणून तयार करण्यात आले आहे. यूजीसी-नेट, एमएच-सेट, एफएसीटी, एफएसीटी प्लस, सीयूईटी-पीजी, एआयएफएसईटी तसेच सहाय्यक प्राध्यापक भरती परीक्षा आदी परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तकातील २५०० बहुपर्यायी प्रश्नांचा उपयोग होणार आहे. फॉरेन्सिक सायन्स शिक्षणाच्या क्षेत्रात शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला चालना देण्याच्या विभागाच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण भाग आहे.
कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर आणि अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख यांनी संपादक मंडळाच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे. देशभरातील फॉरेन्सिक सायन्स विषयाच्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास संपादक मंडळाने व्यक्त केला. हे पुस्तक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.