03 April 2026
Chhatrapati Sambhajinagar, April 3: A one-day workshop on “Software Skills for Experimental Physics” was successfully organized at Einstein Hall by the Department of Physics, School of Basic and Applied Sciences, MGM University. The workshop featured expert guidance from Dr. Deepak Gadani, Professor from Gujarat University, as the resource person.
On this occasion, Dean Dr. Prapti Deshmukh; Emeritus Professor Dr. K. M. Jadhav; Head of Department Dr. Kranti Zhakade; Dr. L. P. Singh; Dr. Chaitali More; along with faculty members, students, and distinguished guests were present.
The workshop included practical demonstrations based on undergraduate and postgraduate experiments such as simple pendulum, projectile motion, damped harmonic motion, and Newton’s rings. Dr. Deepak Gadani demonstrated how to record videos using Tracker software and analyze them to obtain accurate measurements.
The program was compered by Dr. Harshada Patil. Sakshi Devde, Vandana Thakur, Krishna Khillare, Devyani Jain, and Chanchal Shinde contributed to the successful organization of the event.
-----------------
एमजीएममध्ये भौतिकशास्त्र विषयावरील कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि.३ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने ‘सॉफ्टवेअर स्किल्स फॉर एक्सपेरिमेंटल फिजिक्स’या विषयावर आईनस्टाईन सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून गुजरात विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.दीपक गडाणी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, एमेरिटस प्राध्यापक डॉ.के.एम.जाधव, विभागप्रमुख डॉ. क्रांती झाकडे, डॉ.एल.पी.सिंग, डॉ.चैताली मोरे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत सिंपल पेंडुलम, प्रोजेक्टाइल मोशन, डॅम्प्ड हार्मोनिक मोशन, न्यूटनचे रिंग्स यांसारख्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रयोगांवर आधारित प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. डॉ.दीपक गडाणी यांनी ट्रॅकर सॉफ्टवेअरच्या साहाय्याने व्हिडिओ कसे रेकॉर्ड करायचे आणि त्याचे विश्लेषण करून अचूक मोजमाप कसे करायचे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हर्षदा पाटील यांनी केले. साक्षी देवडे, वंदना ठाकूर, कृष्णा खिल्लारे, देवयानी जैन व चंचल शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न केले.